Union Budget Finanace Minister Nirmala Sitharaman Live: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आता १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. या बरोबरच लघू उद्योग, शेती, उत्पादन, रोजगारासह ३६ औषधांवरील करात सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता ३६ औषधांवरील शुल्क कर पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे, तसेच सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. दरम्यान अर्थसंकल्प सादर केल्यावर आता निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेतून दिलेली उत्तरं पाहूया