Union Budget 2025 Girish Kuber Explained: गेल्या खेपेस सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये एनडीएच्या पाठीशी उभे राहिलेल्या तेलगु देसमला अर्थात आंध्र प्रदेशाला प्राधान्य होते. या खेपेस तसेच प्राधान्य यंदा निवडणुका असलेल्या बिहारला मिळाले आहे. पूर्वी अर्थसंकल्पात राजकीय लाभ अशी बाब थेट दिसत नव्हती. मात्र आता भाजपा सरकारने गेल्या दोन वर्षांत सारे काही थेटच असे धोरण राबवलेले दिसते. अर्थात बिहारसाठी तरतूद करताना बिहारच्या गरजा महत्त्वाच्या की, राजकीय लाभ हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे शिक्षणासाठी तरतूद महत्त्वाची की, विमानतळ ही बिहारची गरज आहे. आयकरातील वजावट हा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आयकरमुक्त या शब्दावर खेळ सुरू आहे. खरेतर वजावट कशी असणार हा मुद्दा तपशील येईल त्यानुसार महत्त्वाचा ठरणार आहे… लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले केंद्रिय अर्थसंकल्पाचे परखड विश्लेषण