१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचं बजेट सादर केलं. बजेट संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांसाठी निराशाजनक बजेट आहे. तसंच शेतकरी, दलित आणि आदिवासी यांच्या तोंडाला पाणी पुसणार हे अर्थसंकल्प असल्याचंही ते म्हणाले. तसेच पुढील तीन ते चार महिन्यात भारताची अर्थव्यवस्था कोसळेल, असे संकेतही त्यांनी दिले आहे.