मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली होती. त्यानंतर शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवला. यावरून आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. तसंच जातिवादाचा नवा अंक महाराष्ट्राने पाहिली, असं विधानही त्यांनी केलं.