संतोष देशमुख यांची निर्घृणपणे झालेली हत्या याचं समर्थन कदापिही होऊ शकत नाही. देशमुख कुटुंबीयांच्या दुःखात भगवानगड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी न्यायव्यवस्थेने तातडीने पावले उचलावीत, असं प्रतिपादन भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी केलं आहे. धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर नामदेव शास्त्रींवर टीका केली जात होती. त्यानंतर आज संतोष देशमुख यांचे भाऊ आणि मुलगी अनुक्रमे धनंजय देशमुख आणि वैभवी यांनी भगवान गडावर नामदेव शास्त्रींची भेट घेतली.