…आणि अवकाशात ISS वेगाने जाताना दिसलं!
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकले आहेत. त्यांना पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक उघड्या डोळ्यांनी पृथ्वीवरून पाहण्याचा दुर्मिळ योग पुणे-मुंबईकरांसाठी रविवारी संध्याकाळी जुळून आला. यावेळी आकाशात उघड्या डोळ्यांनी हे अवकाश स्थानक वेगाने जाताना पाहायला मिळालं. ‘लोकसत्ता डॉट कॉम’चे नियमित वाचक प्रसाद दीक्षित यांनी टिपलेली त्या क्षणांची ही दृश्यं!