पुण्यात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा सांगत सोहळा रविवारी पार पडला. यावेळी अभिनेता रितेश देशमुखला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर रितेश देशमुख यानं आपल्या भाषणात राज ठाकरेंचं कौतुक केलं. तसंच आपला पहिला मराठी चित्रपट राज ठाकरेंमुळे झाला, असं म्हणत एक किस्साही रितेशनं यावेळी सांगितला.