सध्या वाचन कमी झाले आहे, कारण जे काही येतं ते व्हॉट्सअॅपवरच येत आहे. ते खरं आहे की खोटं हे आपण पाहतही नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी व्हॉट्सअॅप मेसेजचं उदाहरण दिलं. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुण्यात पार पडलेल्या मराठी विश्व संमेलनातील सांगता सोहळ्यात ते बोलत होते.