Maharashtra Kesari 2025: अहिल्यानगरमध्ये रविवारी (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी पार पडली पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. आज पृथ्वीराज मोहोळ याने दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.त्यानंतर त्याने माध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळी पृथ्वीराजनं पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली.