Maharashtra Kesari Controversy Shivraj Rakshe: २ फेब्रुवारीला अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज मोहोळने उपांत्य फेरीत पैलवान शिवराज राक्षे आणि अंतिम फेरीत पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावर विजय मात करत मानाची गदा पटकावली. पण या दोन्ही फेरीच्या सामन्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. अंतिम सामन्यानंतर पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी आणि गैरवर्तनासाठी पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांना कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे. दरम्यान या वादावर आता दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.