सोमवारची पहाट शिर्डीला हादरवणारी ठरली. शिर्डीत एकाच दिवशी तिघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. यामध्ये शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांवर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांची निर्घृण हत्या केली. तर आणखी एका व्यक्तीवर असाच हल्ला झाल्याने ती व्यक्ती गंभीर जखमी आहे. याप्रकरणी शिर्डी व राहाता पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करत एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.