महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे पडसाद सोमवारी संसदेत उमटले. महाराष्ट्रात ७० लाख नव्या मतदारांची नोंदणी झाल्याचा दावा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. यावेळी शिर्डीतील एका इमारतीचा उल्लेख केला मतदार अचानक आले कुठून, असा प्रश्न विचारत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.