Ambernath Murder Case: अंबरनाथ पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ एका महिलेवर चाकू हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.३) दुपारी घडली आहे. दिवसाढवळ्या हा चाकू हल्ला करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सीमा कांबळे (४२) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी आणि महिला दोघेही शिवमंदिर परिसराततील बारकुपाडा येथे राहण्यास असल्याची माहिती सहाय्ययक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली. दरम्यान अवघ्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपी राहुल भिंगारकर या तरुणाला ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू केली आहे.