Kaka Pawar: महाराष्ट्र केसरी २०२५ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे एकमेकांविरूद्ध भिडले. महाराष्ट्र केसरीच्या पंचांनी अवघ्या ४० सेकंदात पृथ्वीराज मोहोळ विजयी झाल्याचं घोषित केलं आणि यानंतर कुस्तीच्या मॅटवर मोठा वादंग पाहायला मिळाला. शिवराज राक्षेने पंचांशी हुज्जत घातली. या सर्व प्रकरणावर आता कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.