Lung Cancer In Non Smokers: कधीही धूम्रपान न करणार्यांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे आणि वायुप्रदूषण या वाढीस कारणीभूत ठरू शकते, असा धक्कादायक खुलासा एका नवीन अभ्यासातून समोर आला आहे. मंगळवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त ‘द लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नल’मध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला.जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ (IARC)मधील संशोधकांनी ‘ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी २०२२’ डेटासेटमधील माहितीचे विश्लेषण केले. ‘एडेनोकार्सिनोमा’ (adenocarcinoma), ‘स्क्वॅमस सेल कार्सिनोमा’ (squamous cell carcinoma), ‘स्मॉल अॅण्ड लार्ज सेल कार्सिनोमा’ (small- and large-cell carcinoma) या चार उपप्रकारांसाठी राष्ट्रीय स्तरावरील फुप्फुसाच्या कर्करोगाच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला.