Sunetra Pawar Talika Adhyksh In Rajyasabha: लोकसभेत पराभव, राज्यसभेत वर्णी, मानाचा बंगला आणि आता थेट मोठी जबाबदारी.. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची राजकीय कारकीर्द ही मागील वर्षभरापासून चांगलीच जोरदार चर्चेत आहे. सुनेत्रा पवारांवर राज्यसभेत आता मोठी जबाबदारी सोपवून एकार्थी अजित पवारांची पॉवर राज्यातच नव्हे तर दिल्लीतही वाढल्याचं म्हटलं जात आहे.या सगळ्या चर्चांचं कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांना आता राज्यसभेच्या तालिका अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यसभा खासदार व महाराष्ट्रातील मिसेस उपमुख्यमंत्रींची ताकद याने कशी वाढलीये? तालिका अध्यक्ष म्हणजे काय याविषयी आपण आता जाणून घेऊया.