BMC Budget 2025-26: श्रीमंत महापालिका अशी ख्याती असलेल्या मुंबईचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज, ४ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगरानी यांनी अर्थसंकल्प सादर केला. प्राप्त माहितीनुसार, यंदा मुंबई पालिकेतर्फे तब्बल ७४ हजार ४२७. ४१ कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा १४.१९ टक्क्यांनी वाढल्याचं दिसतंय. दरम्यान या ७४ हजार कोटींहून अधिकच्या अर्थसंकल्पात कोणत्या कामासाठी किती खर्चाची तरतूद करण्यात आलीये हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह.