Kalyan Robbery CCTV: कल्याण पूर्व सूचक नाका परिसरातील मॉडर्न होम्स सह आजूबाजूच्या तीन ते चार दुकानात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. अडीच तीन वाजण्याच्या सुमारास या तीन ते चार दुकानाचा शटर तोडून दुकानांमधून रोख रक्कम लॅपटॉप असा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या चोरीच्या घटनेमुळे या परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.