Pune: गेल्या काही दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर हे चर्चेत आले होते.एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांनी केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राहुल सोलापूरकर एक व्हिडीओ शेअर करुन या विधानामागची त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, असंही त्यांनी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये नमूद केलं आहे. पण आता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर ठाकरे गटानं आंदोलन केलं आहे.