राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोप करण्यात येत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणापाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येत आहेत. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या एका विधानावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंत्र आव्हाड यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर त्यांना सावधगिरीचाही इशारा दिला आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहू.