Chhtrapati Sambhajinagar 7 year Old Kidnapped CCTV: दोन कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या सातवर्षीय मुलाचे कारमध्ये कोंबून अपहरण करण्यात आले. ही घटना शहराच्या गजबजलेल्या वस्तीचा भाग असलेल्या उच्च न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या सिडको एन ४ मध्ये घडली. या घटनेनंतर पोलिसांनी ३० अधिकारी आणि १५० अंमलदाराची पथके स्थापन करून आरोपींना जाफराबाद (जि. जालना) परिसरातून ताब्यात घेत मुलाची सुखरूप सुटका केली.