Shirdi Trust Decision on Mahaprasad: “महाराष्ट्राचे सगळे भिकारी इथे गोळा झालेत, भोजनावर इथे किमान २५ रुपये तरी आकारायला हवेत” ही मागणी आठवतेय का तुम्हाला? राज्यात प्रचंड गदारोळ घडवणारं हे विधान सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत सभेत बोलताना केलं होतं. साई संस्थानाच्या प्रसादालयातील भोजनावर पैसे आकारून त्याचा फायदा स्थानिक तरुण पिढीसाठी करावा अशी मागणी विखे पाटलांची होती मात्र हे विधान करत असताना त्यांनी वापरलेला भिकारी हा शब्द वादग्रस्त ठरला आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या प्रसंगाची पुन्हा उजळणी करण्याचं कारण एवढंच की आता शिर्डी संस्थानाकडून भक्तांसाठी राबवण्यात येणाऱ्या महाप्रसादालयाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.