Ajit Pawar Angry Reaction: पोलिसांच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित हुल्लड कार्यकर्त्यांना दम दिला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सत्काराआधी काही जणांनी शिट्ट्या वाजवल्या यावर अजित पवारांनी संताप व्यक्त करत सज्जड दम दिला आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचा आज भूमिपूजन सोहळा पार पाडतो आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत.