Ajit Pawar vs Mahesh Landge: पिंपरी- चिंचवड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय उभारणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे विधान महेश लांडगे यांनी केल्यानंतर अजित पवारांनी तोच धागा धरून महेश लांडगे यांना माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं, हे मला माहित नाही. परंतु, ज्यानं चांगलं काम केलं आहे. त्याला चांगलं म्हणाला शिका. असं म्हणत अजित पवारांनी आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला आहे.