Devendra Fadnavis On Illegal Hoardings In Pune: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. उद्योगाबाबत कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये. अशा सक्त सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते