राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे हे सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्याभोवती वाद निर्माण झाला असतानाच आता त्यांना कौटुंबिक प्रकरणांना सामोरे जावे लागत आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी त्यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्यात न्यायालयाने अंतरिम निकाल दिला असून करुणा मुंडे यांना मासिक दोन लाख रुपयांचा देखभाल खर्च द्यावा, असे निर्देश दिले आहेत. असं असतानाच धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशीव मुंडेनं त्याची आई करुणा शर्मा मुंडेवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत मुलावर प्रेशर टाकल्याचा आरोप केला आहे.