राज्य सरकार सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना आता काही कल्याणकारी योजनांना सरकार बंद करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक चणचणीतून बाहेर पडण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू झालेली आनंदाचा शिधा ही योजना आता बंद करण्याचा विचार असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला टोला लगावला आहे. तसंच याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.