मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. यानंतर त्यांनी चाकणच्या निबे उद्योग समूहाला भेट दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातामध्ये एके ४७ बंदुका घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अजित पवारांनी “आम्ही दोघं तर सगळ्यांना उडवून टाकू”, अशी मिश्कील टिप्पणी केली. तसंच उपस्थित पत्रकारांवर बंदूक रोखत “महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर बघा”, असं विधान केलं अन् उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.