संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाषण केलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसवर टीका केली. यावेळी ते म्हणाले, लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांवरील कविता आकाशवाणीवर सादर करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना काँग्रेस सरकारने आकाशवाणीतून कायमचे हद्दपार केलं, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक कलाकारांची नावं देखील घेतली.