राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांनी ऑपरेशन टायगर होणार असल्याचं विधान केलं होतं. तसेच मंत्री उदय सामंत हे देखील माध्यमांशी बोलताना ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठं भाष्य केलं होतं. ठाकरे गटाचे काही खासदार संपर्कात असल्याचे दावे शिंदे गटाकडून केले जात होते. मात्र, यानंतर यावर आता ठाकरे गटाच्या खसदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच “१०० टक्के आम्ही नऊ खासदार कुठेही जाणार नाहीत”, असं स्पष्टीकरण खासदार अरविंद सावंत यांनी दिलं आहे.