आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार राजन साळवी हे ठाकरे गट सोडणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, राजन साळवी यांच्याबाबत आता आमदार किरण सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. ‘लोकसभेनंतर राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.