महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मारकडवाडीतील मतदान आणि साताऱ्यातील पराभव याचं उदाहरण दिलं. त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरे यांचा देखील उल्लेख केला.