Amit Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्ता मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ४२ आमदार कसे निवडून आले? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. यावर पलटवार करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना स्वतःचा मुलगाही निवडून आणता आला नाही, असा टोला लगावला होता. अजित पवारांच्या या टीकेला आता अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.