Sanjay Raut: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं आहे.भाजपाला ४८ आणि आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहे, तर काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.