Narendra Modi: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवलं. त्यामुळे आता दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाला ४८ आणि आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.अशातच दिल्लीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. भाषण करताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली.