Pune: काही दिवसांपूर्वी पोलीस हवालदार राजेश नाईक यांनी दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवले होते. याचा राग आल्याने त्या व्यक्तीने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला होता. यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले. त्यानंतर तो आरोपी फरार झाला होता. आता पोलिसांनी त्या आरोपीला शोधले आहे. आदिनाथ ऊर्फ बबलू मसाळ असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्या आरोपीची धिंड देखील काढली आहे.