अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात एकच संताप व्यक्त करण्यात आला होता. हे प्रकरण शांत होत नाहीत तेच आता सोलापूर हे पुन्हा एकदा एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चे आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाची त्यांची व्हिडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून राहुल सोलापूरकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत पुन्हा एकदा माफी मागितली आहे. आपल्या फेसबुक अकाऊंवरून त्यांनी यासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट केला आहे.