माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास पालिका प्रशासनाने नकार दिल्यामुळे पीओपीच्या मूर्तींची निर्मिती करणारे मूर्तीकार आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या संदर्भात आता भाजापा नेते तथा माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.