Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर हे चर्चेत आहेत. आता राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल सोलापूरकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वक्तव्य करताना दिसले. आता त्यांच्या वक्तव्याचा अनेक जण निषेध करत आहेत. पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आज भीम शक्ती संघटनेनं आंदोलन केलं आहे.