प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया हा आपल्या बीरबायसेप्स या चॅनेलवरील पाॅडकास्टमुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे. आता याच रणवीरनं विचारलेल्या एका आक्षेपार्क्ष प्रश्नामुळे सध्या तो प्रचंड ट्रोल होत आहे. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये त्याने एका स्पर्धकाशी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं. त्याची व्हिडीओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत. रणवीरला बॉयकॉट करण्याचीही मागणी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारावाईचा इशारा दिला त्यानंतर आता रणवीरनं माफी मागितली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.