किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय ममता कुलकर्णी यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाकुंभमेळ्यात सन्यास घेत हे पद स्वीकारलं होतं. मात्र त्यांना दिलेल्या या पदावरून अनेकांनी आक्षेप घेतला होता. याबाबत बोलताना आता ममता कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.