माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत आज (१० फेब्रुवारी) दुपारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली, यानंतर अखेर ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावर सुखरुप दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावरून आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. तानाजी सावंत यांनी सत्तेचा, आमदार असल्याचा आणि आपल्याकडे पैसा असल्याचा गैरवापर करत ताकदीने खोटी केस दाखल करून घेतली आणि चैन्नईहून मुलाला परत आणलं हे गंभीर आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.