Protest Against Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ दहा दिवसांपूर्वीसमोर आला होता. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.त्या विधानाच्या निषेधार्थ राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते.तर ही घटना थांबत नाही तोवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला.त्यानंतर राज्यातील विविध संघटना आक्रमक झाल्या.त्या पार्श्वभूमीवर राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर चोख पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.या सर्व घडामोडी दरम्यान आज आरपीआय आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.