Mumbai Pune Expressway Panvel Exit Closed: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे. कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झीट हा ११ फेब्रुवारी पासून पुढील ६ महिने बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी MSRDC कडून देखील खबरदारी घेण्यात आली आहे. या संदर्भात कळंबोली जंक्शनचे प्रकल्प अभियंता ऋषिकेश कोरडे यांनी अधिक माहिती दिली आहे.