परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धस यांनी केलेल्या विधानावरून आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी टीकास्त्र डागलं आहे. सुरेश धस यांचा खरा जातीवादी चेहरा समोर आला आहे, अशी टीका त्यांनी केली. त्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या स्वतंत्र पक्षाच्या विधानावरही त्यांनी भाष्य केलं.