माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत काल दुपारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली, यानंतर अखेर ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावर सुखरुप दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर तानाजी सावंत यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करीत पोलिसांवर दबाव आणून अपहरणाचा गुन्हा दाखल केला,असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर तानाजी सावंत यांचा मुलगा गिरीराज सावंत यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.