Eknath Shinde & Sharad Pawar : शरद पवार यांची गुगली राजकारणात अनेकांना कळत नाही. पण माझे आणि शरद पवार यांचे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढेही टाकणार नाहीत असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.