Eknath Shinde Award: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात जेव्हा महाराष्ट्र गीत सुरु झालं तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या कृतीने त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे.