महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी नागरी प्रश्नांबद्दल जाण असलेला नेता, असं म्हणत एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.