Amol Mitkari: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला.या पुरस्कार सोहळ्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय धुसफूस सुरू झाली. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. “ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे.”, असं संजय राऊत म्हणाले. अशातच आता अमोल मिटकरी यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.